मातंग समाजोन्नतीसाठी बार्टीच्या धर्तीवर आटीची स्थापना करावी -लसाकमची मागणी
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्रात मातंग समाज अनुसूचित मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात दोन नंबरवर आहे. मात्र विकासाच्या बाबतीत सर्वांच्या खाली नंबर लागतो. मातंग समाजाचा सर्वागिण विकास करायचा झाल्यास त्यास विशेष उपक्रम राबविणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील ५९ जाता विकास होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन केली आहे. मात्र त्यामध्ये मातंग समाज व अन्य तत्सम ५७ जाती यापासून वचित राहिल्या आहेत. त्यामध्ये मातंग समाज लोकसंख्येने अधिक असूनही त्याची प्रगती होवू शकली नाही, ही विकासाची दरी दूर करण्यासाठी मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आटी) तात्काळ स्थापन करून मातंग समाजाला मायबाप सरकारने न्याय देवून मातंग समाजाला विकासाच्या प्रवाहास आणावे अशी मागणी क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ तालुका शाखा औसा च्या वतीने औसा तहसीलदार यांना दिनांक 22 फेब्रुवारी बुधवार रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले.यावेळी निवेदन देताना संभाजी शींदे,जालिंदर कांबळे,पंढरी जाधव, हिरालाल कांबळे, आत्माराम मिरकले,राम कांबळे,किरण कांबळे आदि उपस्थित होते.
0 Comments