महाशिवरात्री निमित्त अभंग वाणी उत्साह 

औसा प्रतिनिधी

 महाशिवरात्रीच्या पावन परवा निमित्त सद्गुरु गोविंद बाबा सेवा मंडळ आयोजित श्रीक्षेत्र राजापुर ता श्रीगोंदा आयोजित भव्य अभंगवाणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या अभंग वाणी कार्यक्रमांमध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य तथा औसा तालुक्याचे भूमिपुत्र रमेश भुजबळ यांचे सुमधुर गायन होणार आहे. दि 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत पांडवकालीन शिवमंदिर श्रीक्षेत्र राजापूर ता .श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे आयोजित अभंगवाणी कार्यक्रमांमध्ये तबल्याची साथ पंडित नंदकुमार भांडवलकर हे करणार असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सद्गुरु गोविंदबाबा सेवा मंडळाचे ह भ प श्री ज्ञानदेव पोटधन ,हभप ज्ञानेश्वर पाचरणे,हभप नामदेव व्यवहारे ,हभप हरिभाऊ जगताप, आणि हभप  गोरख हरिभाऊ पोटावळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments