औसा तालुका बेलकुंड  मारुती महाराज साखर कारखाना श्रीशैल उटगे यांच्या अग्रहा मुळेच पुन्हा उभा रहिला- माजी मंञी अमित देशमुख   
औसा प्रतिनिधी                              लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि औसा काँग्रेस कमिटीच्या वतीने औसा येथे आयोजित केलेल्या औसा विधानसभा मतदारसंघातील नूतन सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्या सत्कार सोहळ्यास 5 फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी माजी मंञी अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित पारपडला.
या वेळी माजी मंञी अमित देशमुख आपले मनोगत व्यक्त करताना, पंचायत राज व्यवस्थेमुळे विधिमंडळ आणि संसद एवढेच ग्रामपंचायतीलाही अधिकार प्राप्त झाले आहेत,त्यामुळे नुतन पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीतील राजकारण बाजूला ठेवून आता गावच्या विकास प्रक्रियेला चालना द्यावी असे आवाहन यावेळी बोलताना केले.याकामी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढे बोलताना  
श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दिलेला शब्द पाळला आहे. विस्तारीकरणासह कारखाना उत्तमरीत्या सुरू झाला आहे,असे सांगून लवकरच या ठिकाणी इथेनॉल व वीज निर्मितीचे प्रकल्प उभारले जातील अशी ग्वाही दिली. व या मारुती महाराज कारखानाची निवडणुक लढवावी असे अग्रह श्रीशैल उटगे यांनी माझा कडे व माजी मंञी दिलिपराव देशमुख यांच्या कडे वारवार केल्यामुळे हे कारखाना पुन्हा उभा राहिला असेही सत्कार प्रसंगी बोलत होते. 
काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणारा पक्ष आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत औसा नगर पालिका सह जिल्हा परीषद,पंचायत समिती वर कॉग्रेस पक्षाचा झेंडा फडकविन्यासाठी आता कामाला लागावे अशी सुचना करत, जनतेने काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या पाठीशी मतदानाच्या माध्यमातून शक्ती उभी करावी असे आवाहनही यावेळी केले.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हल्लप्पा कोकणे,रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष समद पटेल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नारायण लोखंडे, चेअरमन बाजुळगे रामदास चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमर खानापुरे, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस मौलाना कलीमुल्लाह , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आभयदादा साळूंके,दिपक राठोड, सुलतान शेख,अंगद कांबळे इंजिनियर्स अजहर हाशमी, यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. औसा शहर ,तालुका व मतदार संघातील हजारो नागीकांची उपस्थीती होतो.  हा सत्कार सोहळा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे ,दत्तोपंत सुर्यवंशी,शेख शकील,सह औसा तालुका व शहर कॉग्रेस कमिटीचे  व,विलासराव देशमुख युवा मंचचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments