उंबडगा शिवारात दीड एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील उंबडगा येथील बालाजी पाटील यांच्या शेतातील दीड एकर क्षेत्रावरील ऊस आगीच्या भक्ष स्थानी पडल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. बालाजी पाटील यांच्या उंबडगा येथील सर्वे नंबर 118 मधील जमिनीमध्ये उभा असलेला ऊस दिनांक 14 फेब्रुवारी रोजी अचानक आग लागल्याने जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.
0 Comments