स्मृती गवई यांचे बीएससी कृषी पदवी मध्ये उज्वल यश 
औसा प्रतिनिधी
 स्मृती धनराज गवई या विद्यार्थिनीने पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथून बीएससी ऑनर्स कृषी फलोत्पादन पदवी परीक्षेमध्ये दोन गोल्ड मेडल घेऊन उज्वल यश संपादन केले आहे. स्मृती धनराज गवई या विद्यार्थिनीने फलोत्पादन विभागामध्ये सखोल अभ्यास करून पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अभ्यासातून दोन सुवर्णपदक पटकाविल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू तसेच या विद्यार्थिनी मार्गदर्शन करणारे प्राध्यापक यांनी तिच्या विषयाबद्दल कौतुक केले. येथील सेवानिवृत्त शिक्षक अन्वर पटेल, पत्रकार राम कांबळे, धनराज गवई  यांनी स्मृतीचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments