आमदारांच्या दौऱ्याने रस्त्याची डागडुजी
भादा येथील रस्त्या दुरुस्तीचा प्रकार
औसा प्रतिनिधी 
औसा-तालुक्यातील भादा येथे गेल्या जवळपास दोन महिन्यापासून रस्त्याचे आणि पुलाचे काम सुरू आहे. यामुळे या ठिकाणी रस्ता आणि पुल काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता उखडणे आवश्यक नसतानाही सदरील गुत्तेदारांनी हा रस्ता उघडून ठेवला ज्यामुळे रस्ता वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होते.
ही अडचण लक्षात न घेता येतील वाहतूक औसा ते मुरुड मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने वाहनांची रेलचेल दिवस-रात्र सतत सुरू असते तरीही संबंधित गुत्तेदार या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत काय? कारण हा रस्ता उघडून ठेवल्यामुळे धूळ आणि रिकामा मुरूम यामुळे वाहने पुढे सरकत नाहीत ज्यामुळे ते जागेवर घसरले जाऊन धुलीचा कल्लोळ या भागामध्ये उठतो ज्यामुळे नागरिकांची आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहत नाही.
असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही कारण हा रस्ता उघडून ठेवल्यामुळे या ठिकाणावरून शेतकऱ्यांची ऊस वाहतुकीची वाहने मोठ्या प्रमाणात जाग्यावरच रुतली जातात ज्यामुळे वाहनधारकांच्या वाहनांची टायर पूर्णपणे घासून खराब होत आहे.
याला कारण हा रस्ता असून या रस्त्यावरती उघडून ठेवल्याने वाहनाची टायर जाग्यावर फिरतात यामुळे वाहनधारकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे चर्चा आहे तर मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 20 23 रोजी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांचा दौरा भेटा आणि काळमाथा या ठिकाणी असल्याने संबंधित गुत्तेदारांनी या खराब झालेल्या रस्त्याकडे दुरुस्तीचा मोर्चा वळवून मुरूम टाकून हा रस्ता व्यवस्थित केल्याची चर्चा आहे तर आतापर्यंत या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असलेले गुत्तेदार अचानकपणे येणाऱ्या आमदारांच्या दौऱ्याने खडबडून जागे होऊन हा रस्ता पाणी टाकून दुरुस्त केल्याचे चर्चा सध्या गावामध्ये सुरू आहे.

Post a Comment

0 Comments