औसात लिपिक वर्गीय कर्मचारी यांचे आंदोलन..
औसा:शासनाने प्रसिद्ध केलेल्या बक्षी समिती खंड दोन जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संवर्गातील कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय केला त्या अनुषंगाने जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी यांनी येथील पंचायत समिती च्या गेट वर शुक्रवारी निषेध आंदोलन करीत आपला रोष व्यक्त केला..
लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतनात त्रुटी होत्या काही विशिष्ट व निवडक संवर्गातीलच कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू केले परंतु बक्षी समिती खंड दोन नुसार असा समान पदाना समान वेतन लागू न केल्याने कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला एक पद एक वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, जिल्हा परिषद कर्मचारी यासाठी नेहमी लढा देत आहेत व त्रुटी दूर करण्याची मागणी करीत आहेत मात्र त्रुटी दूर होत नसल्याने अन्याय झाला तो दूर करावा अन्यथा बेमुद आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी पंचायत समिती प्रशासन अधिकारी एच एस बिराजदार, ए.एल.राठोड, जे व्ही पांढरे, विजयकुमार राठोड, यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते...
0 Comments