माजी मंत्री अमित देशमुख यांचा इंजि.अजहर हाश्मी युवा मंचच्या वतीने भव्य सत्कार 
औसा (प्रतिनिधी) औसा विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक यांचा भव्य सत्कार सोहळा निमित्ताने औसा येथे आले असता अजहर हाशमी युवा मंच व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने हाश्मी चौकातील हाशमी कॉम्प्लेक्स येथील प्रांगणात राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी आपल्याबद्दल मी गेल्या अनेक दिवसापासून ऐकतो आणि आज औसा शहरांमध्ये आपली भेट होते. या धावत्या भेटीनिमित्त जो लोकसंच तुम्ही या ठिकाणी एकत्रित केलेला आहे ते आपल्या परिवाराबद्दल खूप काही बोलून जाते.आपले काम,आपल्यावर प्रेम करणारी मंडळी एवढीच नव्हे तर एक दानशूर परिवारातून आपण येता.पिढ्यानपिढ्या आपल्या परिवारातून औसा आणि पंचक्रोशीतील सर्व सामान्य गरीब कुटुंबाला जी मदत आपण करत आहात याबद्दल आपले जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे.आपल्या वाड-वडिलांची पुण्याई आणि त्याच पुण्याईचा धागा धरून तुम्ही पावलं टाकत आहात त्याबद्दल मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आपला सार्थ अभिमान आहे.असे सत्कार प्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे रविवारी 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी बोलत होते.यावेळी या सत्कार समारंभात लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे,माजी कृषी सभापती जिल्हा परिषद लातूर हल्लप्पा कोकणे,रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे,जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे,स्थायी समितीचे माजी सभापती समद पटेल,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शेषराव पाटील,नारायण लोखंडे,रामदास चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमर खानापुरे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव बसवराज धाराशिवे, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस मौलाना कलीमुल्लाह,तालुकाध्यक्ष  दत्तोपंत सूर्यवंशी,शहराध्यक्ष शेख शकील, प्रा.फज़ल हाश्मी,आदमखां पठाण,मुबीन शेख,अब्दुल शेख,सुलतान शेख,ऍड.फेरोज पठाण,डॉ.जिलानी पटेल,मुजक्कीर काज़ी,वसिम खोजन,अकबर खोजन,चाँद सिद्दीकी,अनीस जहाँगिरदार,हमीद शेख आदी काँग्रेस कार्यकर्ते व अजहर हाशमी युवा मंचचे कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.फेरोज पठाण,डॉ.जिलानी पटेल यांनी तर प्रा.फजल हाश्मी यांनी इंजि.अजहर हाश्मी परीवाराच्या वतीने आभार मानले.

Post a Comment

0 Comments