५ फेब्रुवारी २०२३ वार रविवार रोजी मौजे शिवली तालुका औसा येथे मोफत मोतीबिंदू व नेत्र शस्त्रक्रिया महाशिबिराचे आयोजन.......
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एच व्ही देसाई आय हॉस्पिटल मोहम्मदवाडी हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा एकदा दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ वार रविवार रोजी सकाळी ९ वा. मौजे शिवली येथे मोफत मोतीबिंदू व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी सदरील हॉस्पिटलचे डॉ.राजूखान सय्यद व त्यांची टीम नेत्र तपासणीकारिता येत आहे.तेव्हा आपण- माझे मित्र,सर्व सहकारी,पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या दिवशी आपल्या गावातील व परिसरातील वृद्ध नागरिक तसेच गरजू रुग्णांना या ठिकाणी घेऊन येण्यासाठी सहकार्य करावे. तपासणीनंतर ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना पुणे येथील संबंधित हॉस्पिटलला नेऊन मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.तसेच यापूर्वी दुसऱ्या बॅचमधील नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना तपासणीसाठी याच दिवशी घेऊन यावे ही विनंती 👏👏
                आपले
शिवकुमार नागराळे मनसे जिल्हाध्यक्ष लातूर
सौ.रेखा शिवकुमार नागराळे मा. उपसभापती पं.स.औसा तथा राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना

Post a Comment

0 Comments