खंडित झालेला पाणीपुरवठा तात्काळ चालू करा-सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील पाच दिवसापासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तातडीने सुरू करण्यात यावा व शहरातील अनेक विंधन विहिरी बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. ते तात्काळ चालू करण्यात यावे अनेक ठिकाणी शहरात प्रत्येक भागात अनेक ठिकाणी विंधन विहिरी साठी व काही ठिकाणी स्टॅन्ड पोस्ट नाहीत व काही ठिकाणी तोट्या नाहीत व काही ठिकाणी काही लोकांचा ताबा आहे. बरेचश्या ठिकाणी लोक पाईप लावून पाणी घेतात. व सर्वसाधारण लोकांना पाणी मिळत नाही अशा प्रकारे यापूर्वी पाणीपुरवठा खंडित झाला होता. अशा अवस्थेमध्ये लोकांना विंधन विहिरीचे पाणी वापरण्यात येते तरी मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन प्रत्येक प्रभागात विंधन विहिरी दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा व तसेच औसा शहरात स्टेट लाईट बंद पडलेले आहेत ते चालू करण्यात यावे. शहरात स्वच्छतेच्या नावाखाली घंटागाडी सुरू असलेल्या पाच- पाच दिवस घंटागाडी प्रभागात येत नाही. अशा वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असलेले दिसून येत आहे. व नुसती घरपट्टी नळपट्टी भरा शहरातील अनेक नर्धारकांना नळाला पाणी येत नाही. व व्याज दर लावून वसुली करण्यात येते ती कमी करण्यात यावी व ज्यांच्या नळाला पाणी येत नाही अशा लोकांना त्यांच्या नळाची तात्काळ दुरुस्ती करून त्यांना नळ चालू करून देण्यात यावे.व खंडित झालेला पाणीपुरवठा तात्काळ चालू करण्यात यावा अन्यथा एमआयएमच्या वतीने औसा पालिकेला ताळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी आज दिनांक 27 फेब्रुवारी सोमवार रोजी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनद्वारे मागणी केली आहे.
0 Comments