ज्यांच्या कडून आपण शिकत गेलो,शिकणे हे मानवी जिवनाचे सगळ्यात मोठे यश आहे; दत्ता व्हंताळे
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विश्रामगृह औसा येथे बैठक आयोजित केली होती.त्यानूसार या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राजू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 16 फेब्रुवारी गुरुवार रोजी औसा येथील पुण्य नगरीचे पत्रकार दत्ता व्हंताळे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे औसा तालुकाध्यक्षपदी निवड करून त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी 
मी काम करत असताना ज्या दुकानात मी काम करायचे तेथे वृत्तपत्र यायची.तसा मी शिकलेला होतो 11 वी 12 वी पर्यंत मला लहानपणापासून वृत्तपत्र वाचायची फार सवय होती.रेडीओ लागला तर मी बातम्या ऐकायचे.किंबहुना कुठल्याही वृत्तपत्रात सामना सारख्या अग्रलेख वाचायची.राजू पाटील नी त्याकाळात मनोगत सुरू केले होते. तर मी पाटीलांचा वकृत्व वृत्तपत्र लिखाण दररोज पेपर यायचा आणि एकेदिवशी मला पाटील साहेबांची एक बातमी फार आवडली त्यांनी बातमी माझ्या विचाराने क्राईम वर केली होती.ती बातमी घेऊन  भंडारीच्या बोळात पाटील कडे गेलो राजू पाटीलला पहिल्यांदा  बघितलो.मला ते राहवलं नाही . पाटील साहेबा समोर बसलो आणि पाटील साहेब बातमी फार सुंदर लिहिली.कुठला आहेस तू  तुला मी कुठे तरी बघितले सारखे वाटत आहे.मी असं तसं म्हणालो तुला काम जमतंय का,जमत असेल तर देत जा मी म्हणालो जमतंय थोडं थोडं थोडं कुछ तुटाळ मुताळ मला जमतंय एखाद्या नगरपालिकेचा विषय मी पहिल्यांदा मला आठवते बसस्टँडवर कोंबड्याचे कापलेल्या पंखा फार पडलेले होते.त्याची मी एक छोटीशी बातमी केली होती.ती बातमी नेऊन मी पाटीलना दाखविली.पाटिल म्हणाले बातमी फार सुंदर लिहिली मला जेवळे जमत होते तेवढेच मी लिहिले. त्या बातमीला खरा आकार खर रुप त्यांनी दिले.ते मी दुसऱ्या दिवशी वाचलो. त्याच्यावर काय  मी काय लिहिले आणि पाटील नी त्याच्यावर काय संस्कार केले. ते करत करत मी शिकलो.असे संस्कार घेत घेत मध्यंतरी वामन सारखा मित्र मिळाला आता मी खरे सांगतो त्या हिस्ट्रीमध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ आपण योगायोगाने कमी जास्त करतो म्हणजे जलील भाई टाईप करताना त्यावेळी एखाद्या शब्दाचा अर्थ बरोबर करतात.म्हणजे ज्यांच्याकडून आपण शिकत गेलो शिकणे हे मानवी जिवनाचे सगळ्यात मोठे यश आहे.ज्याला मोठे व्हायचे आहे तो शिकला पाहिजे.प्रत्येक गोष्टीत शिकला पाहिजे. ते शिकल्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे. असे दत्ता व्हंताळे  यांनी कार्यक्रमात बोलत होते.   यावेळी या निवडीच्या बैठकीत विजय बोरफळे, मुस्लिम कबीर,राजू पाटील,जलील पठाण आदिनी मार्गदर्शन केले. आणि या निवडीबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, यांच्या हस्ते व एम बी एम 24 न्युज च्या  दुसरे वर्धापन दिनानिमित्ताने या कार्यक्रमात मोमीन समाजामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या मध्ये खुंदमिर मुल्ला यांना समाज सेवा पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात आले. या कार्यक्रमानंतर लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, तालुका अध्यक्ष दत्ता व्हंताळे, राजू पाटील, जलील पठाण, विवेक देशपांडे, आसिफ पटेल, विलास तपासे,वैभव बालकुंदे, इलियास चौधरी, मुख्तार मणियार, मुज्जमील शेख,पाशाभाई शेख,नदीम सय्यद, यांचा नवीन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे औसा तालुकाध्यक्ष पदी दत्ता व्हंताळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल व येथे उपस्थित असलेल्या पत्रकारांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष जावेद शेख, सुलेमान शेख, गोविंद जाधव, अविनाश टिके, अँड वकील इनामदार, संगमेश्वर उटगे, कृष्णा सावळकर,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments