शिव मित्र मंडळ आयोजित औसा फेस्टिवलची बैठक संपन्न
औसा प्रतिनिधी
औसा येथील शिव मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त ऐतिहासिक औसा फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. सन 2023 सालाच्या औसा फेस्टिवल चा कार्यक्रम विविध उपक्रमाने साजरा करण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा, सर्व रोग निदान शिबिर, महिलांसाठी आरोग्य विषयक शिबिर व विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा संकल्प संयोजन समितीने केला आहे. यावर्षीचा औसा फेस्टिवल विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्याचे बैठकीत ठरले असून शिव मित्र मंडळाच्या औसा फेस्टिवलची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे, अध्यक्ष कुणाल दीक्षित, उपाध्यक्ष रविराज चव्हाण, सचिव अल्ताफ करपुडे, सहसचिव नागनाथ पवार, कोषाध्यक्ष राहुल पिंपरे, सहकोशाध्यक्ष पंकज पाटील यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असून या बैठकीसाठी शिवमित्र मंडळाचे मार्गदर्शक राहुल चिटनाळे, चांगदेव माळी, सुग्रीव मुळे, सोमनाथ कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, विशाल पांडे, सिद्धू आळणे, रमाकांत गोमदे, रोहन महामुनी, गजानन शिंदे, उद्धव काळे, शिवाजी मुदाळे, भालचंद्र पाटील, योगेश चव्हाण, आदित्य आळणे यांच्यासह मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments