आरंभ प्री प्रायमरी स्कूल मधून संस्कारक्षम विद्यार्थी घडतील डॉ अफसर शेख
औसा मुख्तार मणियार
शिवप्रयाग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आरंभ प्री प्रायमरी स्कूल च्या माध्यमातून औसा शहरातून संस्कारक्षम विद्यार्थी घडतील आणि हे विद्यार्थी आरंभ प्रायमरी स्कूलच्या संस्कारामुळे आपला नावलौकिक निश्चित करतील अशी अपेक्षा लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी केली. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी माळी गल्ली औसा येथे आरंभ प्री प्रायमरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अफसर शेख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बसवराज धाराशिवे हे होते. व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष मेहराज शेख, श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, श्री वीरभद्रेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ इळेकर, शिवलिंग आप्पा सिंदुरे, संस्थेच्या संचालिका सौ शिवलीला वैजनाथ सिंदुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष 2022 -23 या वर्षाच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये देशभक्तीपर तसेच लोकगीते आणि देवी देवतांच्या गीताच्या तालावर लहान विद्यार्थी विद्यार्थिनी उत्कृष्टत्ता अविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेकडो महिला व पालक प्रतिनिधी यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments