चेतावणीखोर भाषण करणा-यावर  कठोर  कार्यवाही करा-सय्यद मुजफ्फर अली इनामदार 
औसा प्रतिनिधी 
  छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथे शिवजयंती कार्यक्रमात  हैद्राबाद येथील आमदर राजासिंग ठाकुर व अन्य वक्त्यांनी चिथावणीखोर भाषण करून मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावनासह नरसंहार करण्याची फुस व शिवीगाळ केले बाबत व वक्ते व संयोजकावर कठोर कार्यवाही करावी 
याबाबत पोलिस स्टेशन औसा येथे एम आय एम च्या वतीने निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
 याचे सविस्तर वृत्त असे 
छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर परिसरात शिवजयंती निमित्तच्या कार्यक्रमात संयोजकांनी मुख्य वक्ता म्हणून हैद्राबाद येथील आमदार नामे राजासिंग ठाकुर व अन्य वक्त्यांना बोलावून लातूर जिल्ह्याचे धार्मिक एकोप्याला बाधा पोहोचण्यास मुस्लिम समाजाचे 'नरसंहार करण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य व धार्मिक भावना भडकावण्यास व शिवीगाळ व अपमानास्पद अपशब्द वापरून लातूर जिल्ह्यातील धार्मिक सलोख्यास बाधा पोहचवून मुस्लिम समुदायास लक्ष करुन इतर समाजाला चिथावणी देवून भडकावून सामाजिक  धार्मिक भावना भडकावल्या आहेत.
 तरी मे साहेबांनी प्रकारणात चौकशी करुन कार्यक्रमाचे संयोजक वक्ते यांचे विरुद्ध कठोर कार्यवाही करावी अशी तक्रार एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी दिनांक 22 फेब्रुवारी बुधवार रोजी पोलिस स्टेशन औसा येथे पोलिस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे  तक्रार केली आहे.

Post a Comment

0 Comments