औसा नगर पालिका पाणीपुरवठा विभागाची विद्युत कनेक्शन त्वरीत जोडा -खुंदमीर मुल्ला 

औसा प्रतिनिधी 

  सध्या महाशिवरात्री चालु असून व तसेच उन्हाळाही चालु आहे असे असताना आपण औसा नगर पालीका पाणीपुरवठा विभागाची थकबाकी पोटी विद्युत कनेक्शन खंडीत केल्यामुळे औसा शहरातील ५० हजार च्या वर नागरीकांना मुलभूत सुविधापैकी अत्यंत महत्वाचा घटक पाणी यापासुन वंचीत राहावे लागत आहे .
औसा शहरातील नागरीकांची काही चुक नसताना आपल्या व नगर पालीका प्रशासनामुळे
नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी आपण त्वरीत मानुसकीच्या नात्याने औसा नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा खंडीत केलेला विद्युत कनेक्शन त्वरीत जोडून सहकार्य करावे हि विनंती. अन्यथा ५० हजारच्या वर औसेकरांच्या मुलभूत सुविधापैकी महत्वाचे घटक पाण्यासाठी व लोकांच्या हक्कासाठी  युवा मंचच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.या मागणीसाठी विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष सय्यद खुंदमीर मुल्ला यांनी आज 24 फेब्रुवारी शुक्रवार रोजी उपकार्यकारी अभियंता महावितरण विभाग यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments