हिंदू मुस्लिम समाजात द्वेष निर्माण करणा-या आमदार व संयोजकावर तात्काळ कार्यवाही करावी -औसा शहर कॉग्रेस कमिटीची मागणी 
औसा प्रतिनिधी 
लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसरात महाराजांच्या जयंती निमित्त मानवंदना कार्यक्रमात तेलंगणा राज्याचे आमदार टी. राजा ठाकूर यांनी केलेल्या मुस्लिम द्वेष भाषणाची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी या मागणीसाठी औसा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्याचे सविस्तर वृत्त असे
लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजीत मानवंदना कार्यक्रमात आमदार टी. राजा ठाकुर यांनी मुस्लीम द्वेष करणारे बेताल भाषण केलेले आहे. सदरील भाषण हे पुतळा परिसरातील नियम तोडून करण्यात आलेले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगुन हिंदु मुस्लीम समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदरील भाषण हे लातूराच्या संस्कृतिच्या विरुध्द आहे. धर्मनिरपेक्ष लातूर मधील जन्मलेला लाखो शिवभक्त हे सर्व समसजाचे असताना या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य करुन जाणिवपुर्वक जातीय तेड निर्माण करण्याचे प्रयत्न भा.ज.प. आमदार टी. राजा यांनी केले आहे. त्यामुळे महापुरुषांचा व त्यांच्या विचारांचा अपमान झालेला आहे.

 तरी मे. साहेबांनी त्वरीत आपल्या स्तरावरून चौकशीचे आदेश देवून आमदार टी. राजा व सदरील कार्यक्रमाचे संयोजकावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश करण्यात यावे.अशी मागणी औसा शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत गृहमंत्री यांना  22 फेब्रुवारी बुधवार रोजी निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदन देताना कॉग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख शकील, जयराज कसबे, पाशा शेख, पुरुषोत्तम नलगे, अनीस जाहगिरदार, हमीद सय्यद,खुंदमीर मुल्ला, अँड शाहनवाज पटेल,मुजम्मील शेख, इस्माईल शेख, अँड फैय्याज पटेल,नियामत लोहारे, अशोक देशमाने,
आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments