वानवडा येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय 
औसा प्रतिनिधी 
औसा येथून माळकुंजी जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस सकाळी दहा वाजता वानवडा येथे थांबत नसल्यामुळे वानवडा येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत आहे. प्रवासी भारमान अधिक झाल्यामुळे माळकुंजीची येथून येणारी बस वानवडा गावात थांबत नसल्यामुळे शाळा महाविद्यालयासाठी शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच शासकीय निमशासकीय कार्यालयात कामासाठी जाणारे ग्रामस्थ व खाजगी कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दररोज सकाळी आठ तीस वाजता जादा बस सोडावी अशी मागणी आगार प्रमुख औसा यांच्याकडे अपंग जनता दल संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष आत्माराम मिरकले, किरण घोडके, धीरज सोनटक्के, यशवंत घोडके, मोहिनी तळेकर, अंजली काळे, जयश्री वाघमारे, किरण कदम, ऐश्वर्या सपकाळ राधा गंजुरे पल्लवी, सोमवंशी कोमल, रंजवे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments