*नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती साजरी
औसा प्रतिनिधी 
आज दि. 19 फेब्रुवारी 2023 शिवरायांची जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक परमेश्वर स्वामी यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.त्यानंतर *जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा .. .  हे  आपले नवीन राज्य गीत सर्व शिक्षकांनी सामुहिक गायले.  याप्रसंगी सर्व शिक्षकांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. 
याप्रसंगी पर्यवेक्षक मनोहर पाटील, प्रा. दत्तात्रय सुरवसे, प्रा. तानाजी टिके, प्रा. तुकाराम कोळपे, सांस्कृतिक विभागाचे शिवाजी भातमोडे, वरीष्ठ सहाय्यक संदिपान नवखंडे, श्रीमती अर्चना वाघमारे यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments