महाशिवरात्री निमित्त हजारो शिवभक्तांनी मुक्तेश्वर मंदिरात घेतला महाप्रसाद
औसा प्रतिनिधी
औसा शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीच्या उत्सव उत्साहात साजरा केला जातो प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मंदिर समितीच्या वतीने मंदिर परिसरात व शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून शिवभक्तांना दर्शन व महाप्रसादाची अत्यंत चांगली व्यवस्था केली होती. रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी हजारो शिवभक्तांनी ग्रामदैवत मुक्तेश्वर मंदिर येथील मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच हजारो शिवभक्तांनी ग्रामदैवताचे दर्शन घेतले. प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या औसा येथील राजीव शिक्षण केंद्राच्या संचालिकांनी मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ मंडप टाकून आध्यात्मिक शांतीचे प्रशिक्षण देणाऱ्या फलकाद्वारे उपस्थितांना माहिती देण्याची व्यवस्था केली होती. औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच औसा येथील न्यायालयाचे न्यायमूर्ती निलंगा आणि औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी ग्रामदैवत मुक्तेश्वर मंदिर येथे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. औसा शहरातील हजारो महिला पुरुष प्रसाद घेण्यासाठी भक्ती भवानी उपस्थित होते. रविवारी रात्री दहा वाजता शोभेची दारू उडवून महाशिवरात्रीच्या उत्सवाची सांगता करण्यात आली अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष ऍड मुक्तेश्वर वागदरे यांनी दिली.
0 Comments