महाशिवरात्री निमित्त मुक्तेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी महिला भजनी मंडळांनी वेधले शिवभक्तांचे लक्ष 
औसा (प्रतिनिधी)दि.१८
औसा शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यास च्या वतीने महाशिवरात्रीच्या पवित्र दिनानिमित्त शिवालयाच्या दर्शनासाठी मंदिर समितीने शिस्तबद्ध व्यवस्था केली होती शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी हजारो   ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिर येथे शिवालयाचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने उपस्थित भाविकांना महाशिवरात्रीच्या फराळाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिराच्या दर्शन मंडपामध्ये श्री मुक्तेश्वर महिला भजनी मंडळाने दिवसभर शिवभजन सादर केले. महिला भजनी मंडळाच्या शिवभजनाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. मंदिर समितीच्या वतीने आज रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रविवारी रात्री महाप्रसाद झाल्यानंतर शोभेची दारू उडविण्यात येणार असून शहर व तालुक्यातील शिवभक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वागदरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments