सिद्धिविनायक मल्टीस्टेट मधून आता आत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध- श्री शैल्य उटगे यांची माहिती 
औसा प्रतिनिधी 
श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. लातूर या पतसंस्थेद्वारा बँकिंग सुविधांमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील संगणकीत प्रणालीचा वापर करून अत्याधुनिक सेवा सुविधा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. औसा व लातूर शहरातील ठेवीदारांच्या विश्वासाच्या बळावर सिद्धिविनायक मल्टीस्टेट त्या माध्यमातून 71 कोटी 28 लाख रुपयांच्या ठेवी 43 लाख 93 हजार रुपयाची कर्ज वितरण केले आहे. बचत गटातील महिलांना स्नेह श्री स्वावलंबी योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी लघुउद्योग व कुटीर उद्योगाच्या माध्यमातून प्राधान्य दिले जात आहे. 2500 महिलांना कर्ज वितरित करण्यात आले आहे. या वर्षापासून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेतमाल धारण कर्ज योजना चालू केली आहे. शेतकऱ्यांना 4 कोटी 25 लाख रुपयाचे शेतमालतारण कर्ज दिले आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी शिवम उटगे कार्यकारी संचालक, अंकुलगे शाखा व्यवस्थापक, टोळमारे, विजयकुमार बोरफळे, सोसायटीचे चेअरमन, गीतेश शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना श्रीशैल उटगे म्हणाले की संस्थेने आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत सर्व शाखेमध्ये ऑनलाईन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. शाखा संलग्न केल्या असून ग्राहकांना संस्थेचा नवीन शाखांना एसएमएस प्रणालीद्वारे लागलीच माहिती मिळणार आहे. क्यू आर कोड मार्फत फोन पे गुगल पे करता येणार आहे. तसेच आरटीजीएस सुविधा देण्यात येणार असून संस्थेला आयएफसी कोड मिळाला असल्याने खातेदाराच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करता येतील. बँक ग्राहकांना एसएमएस बँकिंग मोबाईल बँकिंग आरटीजीएस व एनइएफटी, सीबीएस कोर सिस्टीम ऑनलाइन कलेक्शन यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता राहणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून संस्थेच्या सभासदांना लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तालुक्यातील शेतकरी वर्गाचे व पशुपालक वर्गाचे हित लक्षात घेऊन शेतमाल तारण योजनेसह दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन इच्छुक पशुपालकांना चांगल्या प्रकारच्या गाई म्हशी दुधाळू जनावरांचे पालन करण्यासाठी कर्ज देण्याचा निर्णय घेतला असल्याने आता संस्था शेअर्स मध्ये वाढ करणार असून शेअर्स घेणाऱ्यांना शेअर्स वरील व्याजासह आकर्षक बोनस असा दुहेरी फायदा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments