कै.गुंडामाय पाटील यांनी बांधलेले शेतकरी निवास ताब्यात द्या


मातोश्री गुंडामाय सेवा प्रतिष्ठाणची  मागणी



औसा मुखतार मणियार

 औसा तालुक्यातील नणंद या गावचे रहिवासी असलेल्या  कै. गुंडामाय सदाशिव  पाटील यांनी त्यांच्या स्वर्गीय माधवराव पाटील या मुलाच्या समर्थनात१९६३-६४ साली औसा येथे शासकीय  ग्रामीण रुग्णालय व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतकरी निवास व पंढरपुर येथे वारकरी निवास तसेच नंणद येथे शाळा बांधली होती. औसा शहरातील सव्हें नं.८८ गायरान वरील शेतकरी निवास वगळता बाकी सर्व युनिट जनसेवा करीत आहेत. सध्यास्थित पाहवयाचे झाले तर शेतकरी निवास औसा या ठिकाणी मागील ३० वर्षापासुन लघु पाटबंधारे विभाग यांचा  बेकायदेशीरपणे कार्यालयीन कब्जा आहे.जे की कै.गुंडामाय पाटील यांचा हेतू हा शेतकरी निवासस्थान निर्माण करून दिलेला होता परंतु शासनाकडून यांची पायमल्ली झालेली आहे. या कारणांमुळे शेतकऱ्यांना शेती विषयक  परिसंवाद सत्र,व्याख्यान ,विविध तज्ञांचे मार्गदर्शन पिकाच्या प्रश्नावर बैठकी घेणे शक्य होत नाही. तरी राष्ट्राला हरित क्रांती कडून सर्मध्दी कडे नेण्यासाठी सदरील शेतकरी निवास हे तात्काळ शेतकऱ्यांसाठी रिकामे करून दयावे तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय औसा यास कै.मातोश्री गुंडामाय पाटील हे नाव देण्यात यावे अशा प्रकारचा निवेदन मातोश्री गुंडामाय सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांना देण्यात आले.जिल्हाधिकारी यांना शासनाच्या जमिनीवर कै. मातोश्री गुंडामायनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बांधलेल्या शेतकरी निवास कै. मातोश्री गुंडामाय सेवा प्रतिष्ठान औसा नोंदणी क्रमांक.लातूर/0000369/ 2022 ला शेतकरी संस्थेला परत देऊन शेतकऱ्यांचा आशिर्वाद घ्यावा. अशी माहिती शासकीय विश्रामगृह औसा येथे पत्रकार परिषदेत मातोश्री गुंडामाय सेवा प्रतिष्ठाण च्या वतीने देण्यात आली. यावेळी गुंडामाय सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विलास लिंबराज लंगर, संस्थापक उपाध्यक्ष  विष्णु निवृत्ती कोळी ,सचिव 
असलमखान गुलाम कादरखान पठाण,संस्थापक  कोषाध्यक्ष धर्मराज सुधाकर पवार, अनिल बबन कोळी,,मोहन गणपतराव माळी, दगडु पंढरी दळवे, मदन सिंह बिसेनी,बालाजी भागवतराव जाधव,प्रदिप विजयकुमार बोडके आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments