औसा न्यायालयाच्या आदेशानुसार भुमाफीया रवी बापटलेसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
हासेगाव येथील जमिनीचा वाद,जिवे मारण्याच्या प्रयत्नासह दरोड्यांच्या गुन्ह्याचा समावेश
औसा
११ मे २०२१ रोजी हासेगाव येथील जमिनीच्या वादातून फिर्यादीसह परिवारातील सदस्यांना रस्त्यात अडवून आरोपी सेवालयाचे अध्यक्ष भुमाफीया रवि बापटले सह इतरांनी कत्ती,राँड,काठी, दगडाने जबर मारहाण करुन गंभीर दुखापत केली.यासह फिर्यादीच्या गाडीवर डिझेल टाकून जाळण्याचा पर्यंत करत हातातील सोन्याचे ब्रासलेट हिसकावून घेतले.या प्रकरणी औसा न्यायालयांने १५६(३)प्रमाणे पोलिसांना निर्देशीत केल्याने शुक्रवारी रात्री औसा पोलिसात रवी बापटले सह ९ जणाविरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यासह दरोड्यांचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोनि शंकर पटवारी यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,भुमाफीया रवि बापटले हा सेवालय आश्रम मधील शिक्षक,चालक,आणि शिक्षण घेणाऱ्या मुलास घेवून फिर्यादीस त्रास देत आहे.फिर्यादीने आपल्या पत्नीच्या नावे २०१६ मध्ये शेषेराव राठोड यांच्याकडून सर्वे.नं.३७२ मधील ५ एकर जमिन खरेदी केली.याच गटात आरोपी रवी बापटले यांच्या नावेही ५ एकर जमिन आहे.पण आरोपी हा संस्थेच्या नावाखाली लोकांच्या जमिनी प्लॉट गुंड प्रवृत्तीने बळकावतो.याच कारणावरून २०१६ पासून आरोपी फिर्यादीस त्रास देत होता.सदरचे प्रकरण न्याय प्रविष्ट असून शासकीय अधिकाऱ्यांनी खुणा करुन दिल्यानंतरही तो वाद निर्माण करत होता.११ मे २०२१ रोजी हासेगाव येथील राजीव गांधी पॉलटेक्नीक कॉलेज समोर फिर्यादी भिमाशंकर बावगे हे आपल्या सफारी कार क्रमांक एम एच २४ एएफ ०९०० घेवून उभे होते.त्यावेळी आरोपी रवी बापटले हे एम एच २४ जे ७१७७ ही रुग्णवाहिका घेवून सेवालयाकडे जात होते.मागील जमिनीच्या वादांचा राग मनात धरुन तु गाडी का लावलास असे म्हणत फिर्यादीसह त्यांची पत्नी जयादेवी बावगे,मुलगा नंदकिशोर बावगे यांना गैरकायदेशीर मंडळी जमवून कत्ती,राँड,काठी,दगडाने मनगट, तळहात,बोटावर जबर मारहाण करुन गंभीर दुखापत केली.यासह डिझेल टाकून गाडी पेटवून देण्याचा पर्यंत केला.हातातील ब्रासलेट हिसकावून घेतले.या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार औसा पोलिसात १)रवी काशीनाथ बापटले २)अर्जुन मुरली पवार ३)प्रकाश गुलाब आडे ४) जगदीश उत्तम रणदिवे ५)अनिकेत प्रभाकर अडगळे ६) समाधान रामदास खंदारे ७) मनोजकुमार सुभाषराव मोटे सर्व रा.हासेगाव यांच्या विरोधात गुरनं ६३/२३ कलम ३०७,३२७,३९५,३९७,१४७,१४८,१४९,५०६सह ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा तपास पोनि शंकर पटवारी हे करित आहेत.
-----
आरोपी बनला फिर्यादी
--------------------
0 Comments