रविकांत तुपकर यांच्या सह 25 कार्यकर्त्यावर पोलिस बळाचा अमानुष हल्ला करून खोट्या गुन्ह्यात अडकवल्यांच्या निषेधार्थ घटनाबाह्य इडी सरकारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध
औसा मुख्तार मणियार 
 शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह 25 कार्यकर्त्यावर पोलिस बळाचा अमानुष हल्ला करून खोट्या गुन्ह्यात अडकवल्यांच्या निषेधार्थ घटनाबाह्य ईडी सरकारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औसा तहसील कार्यालयासमोर शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते अर्धनग्न स्वरूपात सनदशीर मार्गाने घटनाबाह्य इडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करुन औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकरी नेते रविकांतजी तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात आंदोलन घोषित केले होते. त्यावर कसलाही विचार घटनाबाह्य व खोके सरकारने केलेला नाही. उलट आंदोलन कर्त्यावर पोलीस बळाचा वापर करून अमानुषपणे महिलांवरी लाठी हल्ला केला व आंदोलन चिडण्याचा प्रयत्न केला. राज्यात शेतकरी संकटात असताना सरकार मात्र कसलाही आधार देण्याचे काम करीत नाही या जगाला पोसण्याचे काम शेतकरी राजाने केलेले आहे. मात्र याच्याच मताच्या आधारावर राज्य करीत शेतकऱ्यांना नागावण्याचे काम याच देशातील काळया इंग्रज सरकार कडून सुरू आहे. पिकविमा, सोयाबीन व कापूस भाव आदि प्रचंड प्रश्न असताना सुद्धा झोपलेल्या सरकारला जागच येत नाही. सरकारचे चुकीचे धोरण हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे मरण ठरत आहे . प्रचंड प्रश्न असताना सुद्धा झोपलेल्या सरकारला जागच येत नाही. खुर्ची सांभाळण्यासाठी सत्ताधारी कोर्ट कचे-या  व आमदार खासदार यांना खरेदी करण्यात मश्गूल आहे. शेतकरी मात्र उध्वस्त होत आहे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असून राजाचा खोके मंत्री गुलाब पाटील हे रविकांत तुपकर सारख्या शेतकरी नेत्याच्या आंदोलनाला नौटंकी म्हणून हिणवत आहे. म्हणून गुलाब पाटील यांचा जाहीर धिक्कार करीत आहोत. तरी रविकांत तुपकर यांच्या सह 25 कार्यकर्त्यावरील  खोटे गुन्हे त्वरित  मागे घ्यावेत अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी. .असी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी  निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे,  संयोजक राजीव कसबे, मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, नारायण नारखेडकर गौतम कांबळे सुरेश सूर्यवंशी संजय कसबे ,संपत गायकवाड, सुभाष काळे,, महेश पवार नंदकुमार सरवदे, नवनाथ भोसले गजानन कलुरे,  भागवत जाधव, सौदागर वगरे, आत्माराम शिंदे, जयराज गावकरे, राम जंगाले, राजेंद्र एकनाथ गोरे, संतोष जाधव, नंदकुमार विठ्ठल कोले, राहुल सिद्धेश्वर पाटील, राजेश जगताप, गोविंद पवार यांच्या स्वाक्षऱ्या  आहेत.

Post a Comment

0 Comments