औसा प्रतिनिधी
श्री संगमेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ औसा संचलित श्रीमती लक्ष्मीबाई यांचे माध्यमिक विद्यालय फत्तेपुर तालुका औसा या शाळेचे चालू शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर गोरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, बाबुराव मोरे, रविशंकर राचट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, गटशिक्षण अधिकारी अनुपमा भंडारी शिवशंकर कल्याणी, सुनीता गिरवलकर, ज्योतीराम साळुंके, अनिता माळी, दयानंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व निमंत्रित व विद्यार्थी आणि पालक यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमा साठी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव दत्तात्रय सुरवसे, मुख्याध्यापक अनिल मुळे यांनी केले आहे.
0 Comments