ओम साई वस्त्र भांडार चा सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते शुभारंभ 
असा प्रतिनिधी औसा तालुक्यातील वस्त्र शौकिनांच्या सेवेत गरिबांना परवडणारे आणि श्रीमंतास आवडणारे ओम साई वस्त्र भांडार व वस्त्र निकेतन चा भव्य शुभारंभ पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते हीच कापून शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता करण्यात आला सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ओम साई वस्त्र भांडार व वस्त्र निकेतन चे संपूर्ण दालनाची पाहणी करून तालुक्यातील जनतेसाठी अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विलासराव देशमुख युवा मंचचे तालुका अध्यक्ष रवी पाटील, माजी नगरसेवक बंडू वजरे व इतर मान्यवर उपस्थित होते. ओम साई वस्त्र भांडार व वस्त्र निकेतन चे संचालक गुंडेराव माधवराव यादव, सतीश भास्कर गरड, अक्षय मोहन शिंदे, प्रदीप मोहन शिंदे आणि आकाश रामचंद्र शिंदे यांच्या संकल्पनेतून काळदाते कॉम्प्लेक्स मेन रोड औसा येथे उभारण्यात आले आहे ,रवींद्र काळदाते व त्यांच्या कुटुंबीयातर्फे सुद्धा सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमासाठी निमंत्रित तसेच नातेवाईक व शहरातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments