मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना औसा तालुक्यात प्रतिसाद 
औसा प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य निवडणुकीमध्ये औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातून मराठवाडा शिक्षण संघाचे अधिकृत उमेदवार सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांची उमेदवारी जाहीर झाली असून या निवडणुकीच्या निमित्ताने औसा तालुक्यामध्ये शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी ते प्रचार दौऱ्यावर आले होते येथील विविध महाविद्यालय व शाळेतील शिक्षकांच्या भेटी घेऊन त्यांनी मराठवाडा शिक्षक संघाचा उमेदवार विजयी करावा असे आवाहन केले औसा तालुक्यामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर सातत्याने आंदोलन व धरणे कार्यक्रमातून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी आवसा येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले यावेळी बोलताना सूर्यकांत विश्वासराव म्हणाले आणि अंशदायी पेन्शन योजना रद्द करणे शिक्षकांची वेठबिगारी थांबविणे 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करणे शैक्षणिक संस्थांना वेतन इतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार देणे इंग्रजी माध्यमातील शाळेची आरती देखे त्वरित देण्यात यावीत सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे शिक्षकेतर कर्मचारी भरती वरील बंदी उठवावी उच्च माध्यमिक विद्यालयात वाढीव पदांना मान्यता मिळावी सेवानिवृत्त शिक्षकांना वैद्यकीय परिपूर्ती योजना लागू करावी अशा विविध मागण्या साठी मराठवाडा शिक्षक संघ वचनबद्ध असून शिक्षकाचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघ सातत्याने प्रयत्नशील असून आपणास संधी मिळाल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू व त्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी सुद्धा भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असे प्रतिपादन उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी यावेळी व्यक्त केले शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी तालुक्यातील विविध महाविद्यालय व शाळेतून आपणास उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शेवटी त्यांनी स्पष्ट केले सूर्यकांत विश्वासराव यांचा विजय निश्चित असून औसा तालुक्यामध्ये संघटनेच्या बळावर प्रस्थापिताच्या विरोधात ही लढाई जिंकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत असे माहिती संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे एन जी माळी यांनी दिली

Post a Comment

0 Comments