प्रतिवर्षी प्रमाणे पारंपरिक पद्धतीने हजरत ख्वाजा बाहोद्दीन नख्शबंदी यांचा संदल उर्स संपन्न
औसा प्रतिनिधी
औसा येथील हजरत ख्वाजा बाहोद्दीन नख्शबंदी यांचा संदल पारंपारिक पध्दतीने उत्साहात संपन्न झाला.हजरत ख्वाजा बाहोद्दीन नख्शबंदी यांचा संदल सालाबाद प्रमाणे यावर्षी सय्यद वजीर अली इमदाद अली इनामदार यांच्या घरातून निघून काजी गल्ली,चाटी गल्ली,गांधी चौक, महाराज गल्ली पासून हजरत ख्वाजा बाहोद्दीन नख्शबंदी यांच्या दर्ग्यात संदल पोहचला.यावेळी संदल चडवित आसतांना सर्वांची हजेरी होती.व शहरातील सर्व दर्ग्याचे सज्जादे पाटील,मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा संदल 5 वाजता निघून 6 वाजता दर्ग्यात पोहचले.त्याठिकाणी दर्ग्यात सर्व हजरत ख्वाजा चे सज्जादे सर्व अनुयायी उपस्थित होते.व तसेच यावेळी महसूल अधिकारी,शहराचे काझी, पाटील दर्गा हजरत सय्यद साजाद चे इनामदार, दर्गा हजरत खाकेशफाचे इनामदार, दर्गा हजरत तालीबु-हाणचे इनामदार व सर्व भावीक उपस्थित होते.त्यानंतर सर्वांनी दर्ग्याला संदल चडवून सर्वांना प्रसाद देण्यात आला.त्यानंतर सर्व आलेल्या भाविकांना दर्ग्याचे सर्व सज्जादे यांनी आभार व्यक्त केले.व पोलिस प्रशासनाने या संदलला सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी या संदलमध्ये सय्यद खाजा बाहोद्दीन इनामदार, सय्यद खाजा मजहर अली खाजामिया इनामदार, सय्यद खाजा मुजफ्फर अली हाशम अली इनामदार, सय्यद खाजा झुल्फिकार अली अब्दुल मन्नान इनामदार, सय्यद खाजा मुजबोद्दीन खुदबोद्दीन अली इनामदार, सय्यद खाजा खालेक अली मोईज अली इनामदार, सय्यद खाजा शकील गरीब नवाज इनामदार, सय्यद खाजा असलम अली मजहर अली इनामदार, सय्यद खाजा गयाजोद्दीन बाहोद्दीन इनामदार यावेळी सर्व हजरत ख्वाजा बाहोद्दीन नख्शबंदीचे लहान मोठे सज्जादे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments