मराठा भवन च्या उर्वरित बांधकामासाठी विविध संघटनाचा आंदोलनाचा इशारा
औसा प्रतिनिधी
औसा नगरपरिषदेच्या वतीने औसा शहरासाठी मराठवाड्यातले पहिले छत्रपती शिवाजी महाराज भवन उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. या सभागृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आलेले असताना सदरील बांधकामामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून मुख्याधिकारी तथा प्रशासक अजिंक्य रणदिवे यांनी हे काम थांबविण्यास भाग पाडले आहे. मराठा भवन च्या उभारणीच्या कामापासून हे काम जलद गतीने सुरू असताना काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर सदरील बांधकामांमध्ये त्रुटी असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वास्तविक पाहता हे बांधकाम सुरू झाल्यापासून नगरपरिषदेचे नगर अभियंता यांच्या देखरेखी खाली काम सुरू होते
वेळोवेळी नगर अभियंता यांनी चालू बांधकामाची पाहणी केलेली आहे. औसा शहरात होऊ घातलेले मराठा भवन हे तालुक्यातील समस्त शिवप्रेमी जनतेच्या आस्थेचा व अस्मितेचा विषय आहे. 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवरायांची जयंती तसेच शिव सप्ताहाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येणार असल्याने शहरातील मराठा भवनचे उर्वरित बांधकाम पूर्ण करून शिवजयंती पूर्वी या सभागृहाचा लोकार्पण सोहळा करावा अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने प्रशासक अजिंक्य रणदिवे यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. शिवजयंती पूर्वी मराठा भवन चे काम पूर्ण नाही झाल्यास संतप्त मराठा समाजातील विविध सामाजिक संघटना नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील. असा इशारा संघटनेने दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनामध्ये सकल मराठा समाज संभाजी सेना संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवजयंती समिती पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर सर्वश्री भरत सूर्यवंशी, संजय जगताप, अच्युत पाटील, अँड शाम मोरे ,गोविंद खंडागळे, राजाभाऊ जोगदंड, बाबासाहेब थोरात, अँड.संतोष औटी, मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे, विश्वास औटी, माजी नगरसेवक सुरेश दादा भुरे, अशोक नाईकवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments