प्रजासत्ताक दिनी बोरगांव नगरीत विराजमान होणार संत माऊली महाराज
औसा-(सा.वा.)दि. 23
श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडी येथील ह. भ. प. महादेव महाराज हे नुकलेश्वर बोरगाव येथील ग्रामस्थांच्यावतीने बांधण्यात आलेल्या मंदिरात चाकरवाडीचे संत श्री माऊली महाराज यांची मूर्ती येत्या प्रजासत्तादिनी विराजमान होणार असून या अनुषंगाने बोरगावकरांनी आजपासून सुरु होत असलेल्या भागवत कथेची जोरदार तयारी केलेली असून हा सप्ताह 31 जानेवारी पर्यंत सुरु रहाणार आहे. या कालावधीत भव्य अशा धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. विसाव्या शतकातील महान संत हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर हयात असताना त्यांची या भागावर विशेष मर्जी होती. महाभरातातील पांडवांनी स्थापन केलेल्या बोरगाव येथील नुकलेश्वर महादेवावर त्यांची नितांत श्रद्धा होती. ते जेव्हा या भागात येत असत तेव्हा नुकलेश्वरापुढे ध्यानमग्न होवून तल्लीन होऊन जात असत. या परिसरातील गावागावात त्यांचा मोठा भक्त परिवार असून आजही बीड जिल्ह्यातील चाकरवाडी येथील त्यांच्या समाधीस्थळी हजारो भक्तांची मांदियाळी असते. दरम्यान या भागात त्यांचा मोठा भक्त परिवार असल्यामुळे संत माऊली महाराज यांचे मंदिर उभारले जावे, अशी भक्तांची मोठी इच्छा होती. या अनुषंगाने नुकलेश्वर बोरगाव येथील ग्रामस्थांनी भादा- बोरगाव रस्त्यालगत भव्य असे मंदिर बांधले आहे .या मंदिराचा कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या 26 जानेवारी रोजी हभप महादेव महाराज चाकरवाडीकर व हभप बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक आळंदी यांच्या हस्ते संपन्न होणार असून या सोहळ्याची बोरगावकरांनी जोरदार तयारी केली आहे.
आजपासून सुरु होणाऱ्या या सोहळ्यासाठी भागवत कथाकार ह.भ.प.भागवताचार्य शाहु महाराज आणि कलशारोहण सोहळा दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर आणि ह.भ.प. बालयोगी ब्रह्हामूर्ती बाबाजी महाराज चाळक आळंदी यांच्या हस्ते होणार आहे.
0 Comments