उमर फारूक युवा मंच व्हॉलीबॉल स्पर्धेत एस आर के ग्रुप अजिंक्य औसा-(प्रतिनिधी)दि.30
उमर फारूक युवा मंच यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत भव्य डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन नगर परिषद सांस्कृतिक सभागृह मैदानावर करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये अनेक संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये येथील एस आर के ग्रुप या संघाने प्रथम क्रमांक पटकावून हा संघ अजिंक्य ठरला आहे. तर संतोष आप्पा मुक्ता मित्र मंडळाच्या संघास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम सामना झाला आणि त्यांच्या हस्ते विजेत्या संघाला रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे ,शहराध्यक्ष शकील शेख ,भाजपा जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, धनंजय परसणे,राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे प्रदेश सचिव सुलेमान शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे संयोजक पप्पू भाई शेख यांनी मागील दहा वर्षापासून उमर फारूक युवा मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धाचे सातत्य ठेवल्यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी संयोजकाचे व विजेत्या संघासह सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये चार दिवस पत्रकार आफताब शेख यांनी उत्कृष्ट कॉमेंट्री करून क्रीडा प्रेमींचे मनोरंजन केले.उमर फारूक युवा मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी मोलाचे परिश्रम घेतले.
0 Comments