राज्यातील अल्पसंख्यांक कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करा -सय्यद मुजफ्फर अली इनामदार 

औसा प्रतिनिधी
राज्यातील अल्पसंख्याक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी एमआयएम व अल्पसंख्याक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात असे नमूद केले आहे.
 एम.आय.एम. व अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी अल्पसंख्यांक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी २००९ मध्ये करण्यात आली. त्याच बरोबर मागच्या सरकारने बरेचश्या योजना लागु केल्या   मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत, शैक्षणिक व्यवसायिक कर्ज वाटप करण्यात आले. परंतु मागील ८ वर्षापासुन अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणकारी योजनेचा कसल्याही प्रकारची अंमलबजावणी दिसून येत नाही. व महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाला ज्या हेतुने मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची शैक्षणिक, व्यवसायीक थेट कर्ज अनेक अशा योजना राबविण्यात येत नाहीत. व त्यात अल्पसंख्यांक आयोग जिल्हा व तालुका स्तरीय अल्पसंख्यांक समिती व प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यांक कल्याणकारी योजनेचा कार्यालय असून त्या ठिकाणाहून कसल्याही प्रकारचा अल्पसंख्यांक कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही.

देशाचे पंतप्रधान यांच्या सबका साथ सबका विकास या घोषणा प्रमाणे अल्पसंख्यांक समाजाच्या मुस्लिम, शिख, बौध्द, जैन इत्यादी समाजाचा विकास करण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घ्यावेत.हि विनंती यापूर्वी अनेक वेळा मागणी करुनही शासन दुर्लक्ष करीत आहे.तरी मुख्यमंत्री यांनी  अल्पसंख्याक कल्याणकारी योजनेच्या सर्व योजना तात्काळ सुरू करुन अल्पसंख्याक समाजाला प्रवाहात आणण्यासाठी योजना कराव्यात अन्यथा अल्पसंख्याक समाजाला आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर येऊन घटनेच्या अधिन राहून राज्यभर आंदोलन करावे लागेल.  अशी मागणी एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी निवेदनाद्वारे  जिल्हाधिकारी मार्फत  मुख्यमंत्री यांना मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments