शिवजयंती पूर्वी औसा शहरातील मराठा भवन चे काम पूर्ण करा...... महंत राजेंद्र गिरी महाराज यांची मागणी 
औसा-(प्रतिनिधी)
नगर परिषदेच्या वतीने औसा येथे मराठवाड्यातले पहिले ऐतिहासिक मराठा भवन उभारले जात आहे मराठा भवनचे काम शेवटच्या टप्प्यात आले असताना या कामांमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे हे काम थांबविण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा होणार असून शिवजयंतीच्या पूर्वी मराठा भवनचे काम तातडीने पूर्णत्वास घेऊन जावे आणि या मराठा भवनच्या कामात कोणीही राजकारण आनू नये अशी मागणी महंत राजेंद्र गिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. यावेळी बोलताना महंत राजेंद्र गिरी महाराज म्हणाले की, औसा शहरांमध्ये विविध ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने विकासाची कामे सुरू असताना मराठा भवन च्या कामातच कशा काय त्रुटी आढळून आल्या असा प्रश्न उपस्थित करून नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी या कामी तातडीने लक्ष घालून शिवजयंतीच्या पूर्वी मराठा भवनचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली. या कामात ज्या त्रुटी असतील त्या कंत्राटदाराच्या लक्षात आणून त्रुटीची पूर्णता करावी. मराठा समाज आपल्या पाठीशी सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही राजेंद्र गिरी महाराज यांनी यावेळी बोलताना दिली. या पत्रकार परिषदेसाठी सर्वश्री नागेश मुगळे,  पुरुषोत्तम नलगे, श्याम भोसले,  भरत सूर्यवंशी, वैजनाथ सूर्यवंशी,  प्रदीप सूर्यवंशी, विनायक मोरे, धर्मराज पवार, लंगर, मंगेश जाधव, गोविंद पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments