खादी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा 

औसा प्रतिनिधी

 मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती अंतर्गत खाजगी कार्यालय औसा येथील परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ गांधीवादी नेते आप्पासाहेब हलकुडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच याप्रसंगी नाथ संस्थांचे रवींद्रनाथ महाराज यांच्या शुभहस्ते मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. यावेळी खादी कार्यालयाचे व्यवस्थापक रघुनाथ पोतदार, खादी भांडार लातूर चे व्यवस्थापक व भगवान पोतदार, लिंबाजी देवकते, सचिव जोजन, गुरुनाथ कांबळे, किशन कांबळे, मनोज जोजन, इसाक काजी  यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व सूतकताई विभागांमध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments