शासन दरबारी ग्रामरोजगार सेवकांचा "मान"वाढला पण"धन"नाही 

औसा-सध्या शासन दरबारी ग्राम रोजगार सेवकांच्या जबाबदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून ग्रामसेवकांना काही योजनेतून मुभा देण्याचे काम सध्या शासनाने मागील अनेक वर्षाच्या ग्रामसेवकांच्या मागणीनुसार केले आहे.
परंतु त्यासोबतच ग्राम रोजगार सेवक हे अर्धवेळ काम करणारे कर्मचारी असा शासन निर्णय असतानाही सध्या 'एन एम एम एस' प्रणाली लागू करून अर्धवेळ कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ काम कसे?हा एक मोठा प्रश्न ग्रामरोजगार सेवकांना निर्माण झाला असून याचा असंतोष म्हणून महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन सुरू आहे.
 परंतु याबाबत शासन कोणताही ठोस निर्णय न घेता ग्रामरोजगार सेवकांच्या अधिकारात आणि मानधनांमध्ये वाढ करीत नसून या शासकीय मानाप्रमाणेच या ग्राम रोजगार सेवकांना धन मिळणे आवश्यक आहे परंतु गेल्या 14 वर्षापासून या ग्राम रोजगार सेवकांना दोन पॉईंट 25 या तुटपूजा मानधनावरतीच समाधान मानावे लागत आहे तर या महागाईच्या जमाने मध्ये कुटुंबाचा चरित्र दैनंदिनरीत्या कसा भागवावा हा मोठा यक्ष प्रश्न या ग्राम रोजगार सेवकासमोर नक्कीच दैनंदिन जीवनामध्ये येत असल्याची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. तरी याबाबत शासनाने या ग्राम रोजगार सेवकांच्या दैनंदिन आर्थिक गरजा पूर्ण होतील अशा पद्धतीचे किमान फिक्स मानधन मासिक तत्त्वावरती सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्रातील 35 हजार  असणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांनी संबंधित आमदार,तहसीलदार, गट विकास अधिकारी पंचायत समितीकडे केलेली आहे.
याबाबत शासन कोणता निर्णय घेणार याकडे सर्व ग्राम रोजगार सेवकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Post a Comment

0 Comments