भादा शाळेतील शिक्षक नागापुरे यांची विज्ञान प्रदर्शन जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती
औसा - भादा प्रशालेतील शिवलिंग नागापुरे (स.शि) जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा ता. औसा जि.लातूर
इन्स्पायर अवार्ड मानक योजना व विज्ञान प्रदर्शन लातूर जिल्हा समन्वयकपदी नियुक्तीबाबत संदर्भ -संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूर यांचे पत्र प्राप्त झाले आहे.
केंद्रशासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली यांनी विद्याथ्र्यांना शालेय स्तरापासूनच विज्ञान विषयाच्या अभ्यासाकडे आकर्षित करून विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये संशोधन विकासास चालना देण्यासाठी इन्स्पायर अवार्ड या कार्यक्रमाची सुरुवात केली असून या योजनेची यशस्वीता ही राष्ट्रविकासात योगदान देणारी ठरणार आहे. या योजनेबद्दल आपणास ज्ञात असून या योजनेबद्दलची आवड आणि यापूर्वी या योजनेत केलेले काम विचारात घेऊन लातूर जिल्ह्यात या योजनेची अधिक यशस्वी अंमलबजावणी व्हावी यासाठी आपली इन्स्पायर अवार्ड मानक योजना व विज्ञान प्रदर्शनाचे लातूर जिल्हा समन्वयक म्हणून या पत्राद्वारे नियुक्ती करण्यात येत आहे असे कळविले आहे.
इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय प्रदर्शन दिनांक १३ जानेवारी २०१३ रोजी ऑनलाईन घेण्यात आले आहे. तसेच विज्ञान प्रदर्शन तालुकास्तर १० डिसेंबर ते ०९ जानेवारी २०२३, जिल्हास्तर १० जानेवारी ते ०९ फेब्रुवारी २०२३ राज्यस्तर दिनांक २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे असे पत्राद्वारे कळविले आहे.
याबाबत शालेय कामकाज सांभाळून सदर प्रदर्शन यशस्वी करण्याकरीता आपले योगदान द्यावे.
तसेच लातूर जिल्ह्यात या योजनेत जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी सहभागी होतील यासाठी आपण प्रयत्न करावे. इन्स्पायर अवार्ड योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांना येणा-या समस्येबाबत मार्गदर्शन करून या योजनेसाठी जिल्ह्यातील शाळांची नोंदणी करावी.
असे पत्र (नागेश मापारी)शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर यांनी कळविले आहे.
0 Comments