युवकांनी वायफळ खर्च न करता वाढदिवसानिमित्त लोक उपयोगी उपक्रम राबविण्यात यावे - डॉ अफसर शेख 
 औसा एम बी मणियार

औसा येथील जमीर भैय्या पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने चला रक्तदान करुया! माणुसकीची उंची वाढवूया! व रक्तदान ही जनसामान्यांची सेवा यालाच मानूया ईश्वरसेवा! हे ब्रिद वाक्य घेऊन आज दिनांक 19 जानेवारी 2023 गुरुवार रोजी सारोळा रोड येथील खानपान शॉपच्या बाजूस रक्तदान शिबिर घेण्यात आले.यावेळी या शिबिरामध्ये जमीर भैय्या पठाण यांना माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख,व माजी नगराध्यक्ष जावेद शेख , सुलेमान शेख, अँड वकील इनामदार यांनी शाल व पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी  औसा येथे जमीर भैय्या पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे ते अतिशय स्तुत आहे. आपण वर्षभरामध्ये वाढदिवसाचा ट्रेड  वाढवलेला दिसतो. आणि या त्या दिवशी वाढदिवसानिमित्त अनेक लोक उपयोगी उपक्रम  राबविले जात नाही. खर पाहता आज रक्तदान करणे हे काळाची गरज आहे. आणि सर्वांनी जी आज रक्तदान शिबिर झाले आहे याचा जर आदर्श घेतला तर खरंच आपले सर्वांचे कल्याण होईल. रक्ताचा तुकडा नेहमीच या ठिकाणी भासत आसतो.आणि ज्या रक्ताची जी मागणी आहे त्याचे आणि पुरवठ्याचे प्रमाण हे अतिशय गणित न जुळणार आहे. त्यामुळे युवकांनी वायफळ खर्च न करता आपल्या वाढदिवसानिमित्त असेच काही समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात यावे.जेणेकरुन यामध्ये आपल्या समाजाचा फायदा होईल आणि याबरोबर अन्नदान असुद्या, किंवा वृक्षलागवड असुद्या अशी अनेक उपक्रम आपण आपल्या वाढदिवसानिमित्त करु शकता असे डॉ. अफसर शेख  यांनी जमीर भैय्या पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते. या शिबिरामध्ये जवळपास 50 जणांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदविला.यावेळी रक्तदान केल्यानंतर त्यांना लगेच मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र  देण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.यावेळी या शिबिरामध्ये कॉग्रेस प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, महाराष्ट्र राज्य कुषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी,वसीम खोजन,माजी नगराध्यक्ष भरत सुर्यवंशी,माजी स्वच्छता सभापती मुजाहेद शेख,पाणी पुरवठा सभापती गोविंद जाधव , अनेक मान्यवरांनीही या  रक्तदान शिबिराला येऊन भेटी दिल्या.या शिबिराला औसा सिटी ब्लड स्टोअरचे मालक महेबुब खडकाळे, ज्ञानेश्वर खोजे व सर्व मित्र परिवारांनी या शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरामध्ये डॉ भालचंद्र ब्लड बँक लातूरच्या टिमनी  सहकार्य केले. या रक्तदान शिबिराला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इम्रान पटेल,रहीम शेख, सोहेल सय्यद,सयीद शेख,साहील मूळे,मुजक्कीर शेख,अबुजर शेख, अल्तमास चाऊस,अजहर पटेल,अकमन पटेल,आदिनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments