, शेख सनाऊल्ला दारुवाले यांची संचालकपदी निवड

औसा प्रतिनिधी
औसा शहरातील सिध्दीविनायक नागरी सहकारी पतसंस्थेची आज जिल्हा कॉगेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.या बैठकीत सिध्दीविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजयकुमार बोरफळे तर व्हाईस चेअरमनपदी नजीर मुजावर यांची निवड करण्यात आली.व तसेच संचालक म्हणून शेख सनाऊल्ला दारुवाले,सदानंद शेठे, गोविंद महामुनी,बजरंग जमादार,पवन कांबळे,गणपत डामगिरे, जयश्री ताई उटगे,अल्पना दुरुगकर,सत्यम उटगे यांची निवड करून त्यांचा जिल्हा कॉगेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते या सर्वांचे निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांच्या या निवडी बद्दल त्यांच्या मित्र परिवारामध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments