बसस्थानकातील शौचालयाची घाण न.प. व्यापारी संकुलात व्यापाऱ्याचे आरोग्य धोक्यात
औसा-(सा.वा.)दि.29
औसा येथील मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानकातील शौचालय केवळ नावालाच असून या ठिकाणी सांड पाण्याची कसल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने येथील घाण पाणी नगर पालिकेने बांधलेल्या बांधलेल्या व्यापारी संकुलात येत असल्याने या भागातील व्यापाऱ्यांची व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाण पाणी उघड्यावर येत असल्याने या भागात रोगराई पसरलेली आहे. 
नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करुन भव्य असे व्यापारी संकुलन उभारलेले आहे. परंतू बस स्थानकात असलेले शौचालय हे फक्त नावालाच उरलेले दिसते आहे. सदरील शौचालय हे खुप जूने असून या ठिकाणी प्रवासासाठी कसल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने लाखो रुपये भरुन येथील व्यापाऱ्याने दुकाणे घेतलेले आहेत. परंतू या येणाऱ्या शौचालयाच्या घाणीला व्यापारी वैतागले असून याचा ञास  प्रवासी व या भागातील व्यापारी वर्गांना  ञास सहन करावा लागत आहे. या बाबत येथील शौचालय चालक यांना अनेकवेळा तोंडी सांगितले परंतू  शौचालय चालक माञ या गंभीर बाबीकडे जानूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने येथील व्यापाऱ्याने आगार व्यवस्थापक औसा यांचेकडे लेखी तक्रार करून शौचालयाची येणारी घाण थांबवण्याची मागणी केली आहे.
   परंतू संबंधितास निवेदन जवळपास आठवडा उलटला तरी अद्याप या गंभीर बाबीकडे लक्ष दिलेले नाही तरी वरीष्ठ पातळीवरुन सदरील शौचालयाची पहाणी करुन तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.
  बस स्थानक येथे असलेले शौचालय हे खुप जून्या काळातील असून याची व्यवस्थीत देखभाल केली जात नाही. सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे या घाण पाण्यासाठी आउटलाईनच नसल्याने येथील शौचालय चालक यांनी एक साधा खड्डा मारुन त्यामध्ये हे सांड पाणी सोडले जाते. परंतू हा खड्डा भरलेला असून शौचालय चालक हे खड्यातील घाण पाणी हे येथील नगर पालिकेने बांधलेल्या व्यापारी संकुलात सोडत असून या भागात रोगराई पसरलेली असून येथील व्यापाऱ्याचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सदरील शौचालय तात्काळ बंद करुन व्यापाऱ्यांची व प्रवाशांचे होणारे हाल थांबवावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा ईषारा व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाध्वारे केला आहे.

Post a Comment

0 Comments