शहरातील तिसरा टप्पा रस्त्या चे काम तातडीने  करा- सययद मुजफफर अली इनामदार यांची मागणी.

औसा प्रतिनिधी :-
औसा शहरातील तिसरा टप्पा जामा मसजिद ते हनुमान मंदिर लातूर वेस हा रस्ता बऱ्याच दिवसांनी  रखडलेला असुन  काम तातडीने होत नसल्यामुळे शहरातील नागरीकांना दोन्ही बाजू गटारीचे पाणी  तुडुंब भरल्याने नळाला  पाणी  आले की रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत आहे. व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावे लागतो. घाण पाणी साचले असून त्यांची वहीले वाट लावणे व जामा मस्जिद ते हनुमान मंदिर लातूर वेस हा रस्ता तातडी ने कऱण्यात यावा वारंवार सूचना देऊन हे पालिका प्रशासनाने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत तसेच बऱ्याचशा ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत काही ठिकाणी नळाला पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे तसेच हनुमान मंदिर ते खादि भंडार या ठिकाणी दोन  जागी पाईपलाईन फुटल्याने पाणी वाहत आहे अशा अनेक शहरातील समस्या  असताना  त्याकडे नगर पालिका दुर्लक्ष करीत आहेत तरी आपण याकडे लक्ष घालून सदरील समस्या सोडवण्यात याव्यात अन्यथा  आंदोलन करण्यात येईल अश्या मागणी चा निवेदन एमआयएम  प्रमुख औसा सय्यद मुजफर अली इनामदार यांनी   जिल्हा सह आयुक्त  लातूर व नगरपालिका प्राशासन औसा यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments