शिक्षक मतदार संघासाठी तालुक्यात सरासरी 84 टक्के मतदान 
औसा  (प्रतिनिधी)दि.30 मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवार दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीमध्ये औसा तालुक्यात 1002 मतदारांपैकी 845 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला औसा केंद्रावर 431 पैकी 358, लामजना केंद्रावर 188 पैकी 163, किनीथोट केंद्रावर 137 पैकी 94, बेलकुंड आणि भादा येथे 68 पैकी 62 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला औसा येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार विक्रम काळे यांच्या समर्थकांनी तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रा. किरण पाटील यांच्यासाठी मंडप टाकून मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांसाठी व्यवस्था केली होती. औसा येथील तहसील कार्यालयाच्या बुथवर आमदार विक्रम काळे यांनी भेट देऊन पाहणी केली तर आमदार अभिमन्यू पवार आणि शेतकरी नेते तथा माजी आमदार पाशा पटेल यांनी मतदान केंद्रा बाहेरील मंडपात मतदार करण्यासाठी येणाऱ्यां मतदारांचे स्वागत केले. मतदान केंद्राबाहेर उभारलेल्या मंडपात भारतीय जनता पार्टीचे सुशीलकुमार बाजपाई, कंटापा मुळे, संतोष चिकुर्डेकर, लहू कांबळे, शिवरुद्र मुरगे, माधव सिंह परिहार, दौलत वाघमारे,सुनील उटगे, प्रा. भिमाशंकर राचट्टे, कल्पना डांगे,यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडपामध्ये माजी नगराध्यक्ष डाॕ. अफसर शेख,  काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख शकील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, रशीद शेख, नयुम पठाण, सुलेमान शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
औसा तालुक्यातील पाचही मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडल्याची माहिती तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments