50 कोटी रुपये पाणी पुरवठ्यावर खर्चून औसेकराच्या घशाला कोरड - डॉ अफसर शेख
औसा प्रतिनिधी
औसा शहराला माकणी धरणातून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 50 कोटी रुपये खर्च करण्यात आला.50 कोटी रुपये पाणीपुरवठावर खर्चून सुद्धा ऐन हिवाळ्यामध्ये औसा शहरातील नागरिक पाण्याविना त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्याचे सुरळीत नियोजन नसल्यामुळे नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे
औसा शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. तावरजा प्रकल्पातील पाणी पुरवठा योजनेचे विद्युत बिल थकल्यामुळे 19 जानेवारी रोजी पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन महावितरण ने तोडले आहे. शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन 37 किलोमीटर ची माकणी धरणातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. तसेच तावरजा प्रकल्पात मुबलक पाणी साठा असूनही विद्युत कनेक्शन तोडल्यामुळे औसा शहराला पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकात नाराजी पसरली आहे. 45 ते 50 हजार लोकसंख्येच्या शहराला 15 दिवसातून एकदा नळाला पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. औसा नगर परिषदेचे मुख्य अ धिकारी यांच्या नियोजना अभावी व वेळेत विज बिल न भरल्यामुळे औसेकरावर पाण्यासाठी ही वेळ आली असल्याचा आरोप माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी केला. शहरातील नागरिकांना जानेवारी महिन्यातच पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत असल्याने मुख्याधिकारी व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी नाराजी व्यक्त केली. असून औसा वासियांना उच्च दाबाने नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी अफसर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी प्रतिक्रिया व्यक्त करताना केली आहे.
0 Comments