लातूर पोलिसांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाची जयत तयारी सुरू
 लातूर प्रतिनिधी 
26 जानेवारी 2023 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय तंत्रनिकेत त्यांच्या मैदानावर प्रशासकीय ध्वजारोहण होत असते देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांच्या वतीने जयत तयारी सुरू झाली आहे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रशासकीय ध्वजारोहण होणार असून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथसंचलन व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याची जोरदार तयारी केली जात आहे लातूरच्या ऐतिहासिक क्रीडा संकुल च्या बाजूस पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर पोलीस बांधव आठ दिवसापासून सराव करीत असून यावर्षीचा भारतीय प्रजासत्ताक दिन पोलीस दलातर्फे उत्साहात साजरा होणार असल्याचे कळते.

Post a Comment

0 Comments