पिक विम्यासाठी मनसेचे धरणे आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे
 औसा प्रतिनिधी 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पिक विमा त्वरित देण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या धरणे आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय झाल्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी पिक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याने मनसेच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले. हे आंदोलन प्रशासनाने लेखी पत्र देऊन 30 जानेवारी 2023 पर्यंत पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिल्यानंतर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनामध्ये सर्वश्री मुकेश देशमाने, प्रवीण कठारे,महेश बनसोडे, गोविंद चव्हाण, विकास लांडगे,तानाजी गरड, जीवन जंगाले, अमोल थोरात, ज्ञानेश्वर कदम यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments