औरंगाबाद शिक्षक मतदार संघ निवडणूक -2023
ग्राम पंचायत भादा मतदान केंद्र सज्ज 

औसा -औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 भादा ग्रामपंचायत येथील बूथ सज्ज झाले असून या ठिकाणी सर्व यंत्रणा तहसील कार्यालय कडून पोहच  झाली आहे.
05 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ मतदान क्र 136 असून या केंद्रांतर्गत एकूण मतदान हे 68 आहे.
औसा तालुक्यामध्ये एकूण मतदान केंद्र हे 05 असून यामध्ये औसा,बेलकुंड,लांमजना,भादा,किनीथोट असे एकूण 05 मतदान केंद्र असून या मतदान केंद्रामध्ये एकूण 1014 शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या मतदानासाठी वेळ सकाळी 08 ते 04 पर्यंत असून या वेळेमध्ये सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावने आवश्यक आहे.
याकरिता औसा तालुक्यातील यंत्रणा सज्ज झाले असून बूथ प्रमुख,मतदान केंद्राध्यक्ष, झोनल अधिकारी यांच्या देखरेखी खाली औसा तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रत्येक बूथचे गावाच्या ठिकाणी असणारे ग्रामपंचायत आणि महसूल कार्यालय अगदी सज्ज झाल्याचे चित्र औसा तालुक्यामध्ये दिसून येत आहे.
तर भादा येथील मंडळ अधिकारी पटेल,सज्जचे तलाठी राम दुधभाते,सहायक गट विकास अधिकारी सतिष पाटील,पोलीस कर्मचारी आदी यंत्रणा सज्ज झाले आहे.

Post a Comment

0 Comments