आम आदमी पार्टीचा औसा येथे आनंद उत्सव
औसा प्रतिनिधी 

 आज दिल्ली महानगर निगम च्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये   नेते अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढविण्यात आल्या आणि त्यामध्ये जवळपास पंधरा वर्षाची सत्ता असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या   बहुसंख्य उमेदवाराला हरवून त्या ठिकाणी आम आदमी पार्टीने आपली सत्ता या ठिकाणी काबीज केली आहे. खर म्हणजे जनतेचा विश्वास आणि त्यांचे मत खऱ्या अर्थाने  विश्वास कमवण्याचे काम या माध्यमातून या निवडणुकीमध्ये झाले आहे. केवळ दिल्लीमध्येच नव्हे तर संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आम आदमीची शक्ती आणि विचार हे सतत वाढत असताना दिसत आहे. त्याला कारण तसेच आहे या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कारभाराला विटलेली जनता आणि त्यातून त्यांचं होणारं मतपरिवर्तन ही भूमिका लक्षात घेऊन जनता खऱ्या अर्थाने आज आम आदमी पक्ष आणि त्यांचा विचार प्रत्येक्ष निवडणूकीच्या माध्यमातून पुढे नेहतांना दिसत आहे.भविष्यात आम आदमी चे लोकनेते यांना प्रधानमंत्रीच्या गादीवर बसवण्याचे स्वप्न आम आदमी चे कार्यकर्ते प्रत्येक्ष जनसेवा करुन लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी जिवाचे रान करतील असा मला याप्रसंगी विश्वास वाटतो.आजच्या दिल्ली नगर निगमच्या मिळालेल्या पक्षाच्या यशात दिल्लीकर जनता व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे.त्यांचेही आम्ही औसेकर मनापासुन आभार मानतो.आज अभिनंदनाचा जो कार्यक्रम झाला त्यास उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्ते व पत्रकार यांचे ही या प्रसंगी आभार आणि अभिनंदन. या कार्यक्रमप्रसंगी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अँड अनील  मोरे, शहराध्यक्ष अहेमद शेख, प्रसिद्धी प्रमुख मुख्तार मणियार, अँड गजानन कुसुमकर, अँड हिप्परकर, आत्माराम शिंदे, रणजित मोरे, पत्रकार एस ए काझी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments