कीर्तनातून डोळस समाजाची निर्मिती व्हावी राजू पाटील यांचे प्रतिपादन 
औसा प्रतिनिधी

 आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कीर्तन प्रवचन आणि भजनी मंडळाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले जाते. वाम मार्गाकडे जाणाऱ्या समाजाला गतीचा मार्ग दाखविण्याचे कार्य संत साहित्याच्या माध्यमातून केल्या जाते कीर्तनाच्या माध्यमातून डोळस समाजाची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा संपादक राजीव पाटील यांनी व्यक्त केली. ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यास च्या वतीने कलशारोहण सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवशीय महिला कीर्तन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राजू पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकट पन्हाळे, मुक्तेश्वर शिक्षण संस्थेचे बसवराज पटणे, सौ भारतभाई हलकुडे, मंदिर समितीचे अध्यक्ष ऍड मुक्तेश्वर वागदरे, नाथ संस्थानचे मच्छिंद्रनाथ महाराज, बाजार समितीचे सचिव संतोष सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलताना संपादक राजू पाटील म्हणाले की अध्यात्म क्षेत्राची सेवा करण्यासाठी आज महिला वर्ग मोठ्या संख्येने पुढे येत आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा आणि चालीरीती घालवून समाजाला सन्मार्गाकडे नेण्याचे कार्य आध्यात्मिक क्षेत्रातून आज घडत आहे याचे समाधान वाटते. ग्रामदैवत मुक्तेश्वर देवालय यांच्यावतीने महिला कीर्तनकार यांचा कीर्तन महोत्सव विविध समाजाच्या प्रतिनिधींच्या वतीने सामूहिक महारुद्राभिषेक अखंड शिवनाम व हरिनाम सप्ताह तसेच महाशिवरात्रीचा उत्सव भाविक भक्तांच्या सहकार्याने मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. मंदिर समितीच्या वतीने धार्मिक क्षेत्रामध्ये या समाज प्रबोधन कार्यासोबत अन्नदानाचे मोठे कार्य घडत आहे. यामुळे डोळस समाजाची निर्मिती होण्यास निश्चितच मदत होईल असे शेवटी संपादक राजू पाटील यांनी स्पष्ट केले. शिवभक्त परायण सौभाग्य श्री पाटील गवळी पोरगा यांच्या शिव कीर्तनाने कीर्तन महोत्सवाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. मंदिर समितीने उत्कृष्ट नियोजन केले होते. दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची भव्य सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments