बाबासाहेबांना अभिवादन करून अस्थि दर्शनासाठी पानगाव सहल 
औसा (प्रतिनिधी)दि. ६
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी औसा शहर व तालुक्यातील आंबेडकर प्रेमी बांधवांनी भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच ठिकठिकाणी ध्वजारोहण करून घटनेच्या शिल्पकारांना विनम्र अभिवादन केले. औसा येथे भीम नगर, बौद्ध नगर, समता नगर, तसेच तालुक्यातील बुधोडा, खरोसा, किल्लारी, नागरसोगा, अशिव, मातोळा,  बेलकुंड,उजनी आदी गावासह ग्रामीण भागातही आंबेडकर प्रेमी बांधवांनी प्रतिमेचे पूजन करून महामानवाला अभिवादन केले. डॉ आंबेडकर यांच्या अस्थि पानगाव येथे आणल्यामुळे येथील स्मारक पाहण्यासाठी भीम नगर, बौद्ध नगर, भागातील नागरिकांना अस्थिदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव कल्पना डांगे यांच्या प्रयत्नातून औसा ते पानगाव सहल काढण्यात आली. या सहलीच्या माध्यमातून शेकडो आंबेडकर प्रेमी बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पानगाव येथील स्मारकाचे व  अस्थीचे दर्शन घेतले.

Post a Comment

0 Comments