आयुष्यमान भारत योजना ही सर्वसामान्यासाठी वरदान 
...डाॕ. संजय घटकुळ 
औसा (प्रतिनिधी)दि.5
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुष्यमान भारत योजना तसेच एकात्मिक महात्मा फुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री सहाय्यता निधी इत्यादी माध्यमातून समाजातील वंचित घटक आरोग्य सेवेचा खर्च उचलू शकत नसल्यामुळे अशा घटकांना आरोग्य कवच म्हणून ही योजना वरदान ठरणार आहे. असे प्रतिपादन डॉ संजय घटकुळ यांनी केले.
 नाथ मंगल कार्यालय औसा येथे सुनील उटगे मित्र मंडळाच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेच्या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की , आयुष्यमान भारत योजना, एकात्मिक महात्मा फुले जन आरोग्य योजना, व इतर योजनेमध्ये आरोग्य सेवेचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण 1209 आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 विविध रोगावरील उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 5 लाख रुपयापर्यंत तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 1 लाख 50 हजार रुपये आरोग्य सेवेच्या खर्चाची तरतूद करण्यात आली असून या योजनेचा समाजातील प्रत्येक घटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. औसा शहरातील शेकडो महिला पुरुष व युवक या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ संजय घटकुळ,  रिजनल मॅनेजर ऑफ सोसायटी आरोग्य विभाग ,डॉ बालाजी गोरे जिल्हा समन्वयक सोसायटी ,डॉ जावेद सौदागर वैद्यकीय अधिकारी  ,डॉ. अंगद जाधव वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय औसा श्री विकल्प,श्री राहुल राऊत, श्री जितेंद्र शिंदे( कॉमन सर्विसेस सेंटर), आरोग्य मित्र भीमाशंकर स्वामी व राठोड राहुल,  भाजपा जेष्ठ नेते ॲड. मुक्तेश्वर वागदरे, भाजपा जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता ,तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुनील  उटगे, शहराध्यक्ष लहू कांबळे ,भिमाशंकर मिटकरी, विकास कटके,  मकरंद  रामपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments