आलमला येथील शेतात पाच किलो गांजा पकडला 
औसा (प्रतिनिधी)दि.३ तालुक्यातील आलमला येथील शेतात औसा पोलिसांनी पाच किलो गांजा पकडल्याची घटना शनिवार दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडली आहे याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रमजान बाशामियाॕ मुलांनी रा आलमला यांनी शेतात गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी अचानक छापा टाकून रमजान बाशामियाॕ मुलानी यांच्याकडून पाच किलो 70 ग्रॅम गांजा ज्याची किंमत 37 हजार 345 रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी पकडला असून सदर आरोपी विरुद्ध गुंगीकारक औषधी आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 नुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मागील काही दिवसापूर्वी तालुक्यातील बुधोडा येथेही औसा पोलिसांनी गांजा पकडल्याची घटना घडली होती या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डीपी सानप हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments